आरबीआय/2016-2017/102
डीसीएम(एफएनव्हीडी)क्र.1134/16.01.05/2016-17
ऑक्टोबर 27, 2016
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व बँका.
महोदय/महोदया
नकली नोटा शोधणे व जप्त करणे
आमच्या असे नजरेस आले आहे की, काही तत्वशून्य लोक, जनतेमधील काही लोकांच्या साधेपणाचा व भोळेपणाचा फायदा घेऊन, नेहमीच्या व्यवहारांमध्ये, उच्च मूल्याच्या खोट्या भारतीय चलनी नोटा प्रसारात आणत आहेत.
(2) हे विचारात घेता एका वृत्तपत्र निवेदनामार्फत (सोबत प्रत जोडली आहे) जनतेला विनंती करण्यात येत आहे की, दैनंदिन व्यवहार करत असताना नोटा स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी त्या तपासून घेण्याची सवय करावी आणि खोट्या भारतीय नोटांचा प्रसार थांबविण्यास मदत करावी.
ह्या बाबतीत, कृपया, खोट्या नोटांचा शोध व जप्त करणे ह्यावरील आमचे परिपत्रक डीसीएम (एफएनव्हीडी) क्र.जी.6/16.01/05/2016-17, दिनांक जुलै 20, 2016 चा संदर्भ घ्यावा. त्यात बँकांना सांगण्यात आले होते की, बँकिंग प्रणालीमध्ये आलेल्या नकली नोटा ताबडतोब शोधल्या जातील आणि कोणत्याही परिस्थितीत त्या नोटा सादर करणाराला परत केल्या जाणार नाहीत किंवा त्या पुन्हा प्रदान केल्या जाणार नाहीत ह्याची खात्री करुन घ्यावी. बँकांना असेही सांगण्यात आले होते की, नकली नोटांचा शोध घेण्यास मदत व्हावी ह्यासाठी, सर्व बँक शाखा/ओळखण्यात आलेली बँक कार्यालये ह्यामध्ये, अल्ट्रा व्हायोलेट दिवे/इतर सुयोग्य नोट पडताळणी/शोधक यंत्रे ठेवली जावीत. ह्याशिवाय, बँकांनी खात्री करुन घ्यावी की, रु.100 व त्यावरील मूल्याच्या रोख नोटांच्या खरेपणासाठी त्या मशीन प्रक्रियेतून गेल्याशिवाय त्यांचे पुनःप्रसारण केले जाणार नाही. दिवसभरात कितीही रोख रक्कम आली असली तरी वरील सूचना सर्व बँक शाखांना लागु आहेत. ह्याचे पालन न केल्यास ते रिझर्व बँकेने दिलेल्या निदेश क्र.3158/09/39/00 (पॉलिसी)/2009-10 दिनांक, नोव्हेंबर 10, 2009 चे उल्लंघन समजले जाईल.
(4) काऊंटरवरील व बँक ऑफिसमधील रोख रक्कम हाताळणा-या कर्मचा-यांना, नोटांवरील् सुरक्षा लक्षणांची चांगली जाणीव असून त्याबाबत त्यांना चांगले प्रशिक्षण दिले गेले असले असल्याची खात्री बँकांनी करुन घ्यावी. बँकेचे कर्मचारी व ग्राहक ह्यांना नकली नोटा शोधण्याबाबत शिक्षित करण्यासाठी, आमच्या वेबसाईटवर https://paisaboltahai.rbi.org.in/ माहिती देण्यात आली असून ती त्यांच्या नजरेस आणावी.
(5) नकली नोटांचा प्रसार करणा-या लोकांना ओळखण्यासाठी बँकांनी बँकिंग दालन/क्षेत्र सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवून ते रेकॉर्ड करुन जतन करुन ठेवावे.
(6) येथे पुनश्च सांगण्यात येत आहे की, नकली नोटा शोधणे व त्या जप्त करणे तसेच त्यांचे पुनर् प्रदान/प्रसारण करणे थांबविणे ह्यातील बँकांचे अपयश हे वरील निदेशांचे उल्लंघन समजले जाईल व त्यामुळे त्यासाठी दंड लागु होईल.
(7) कृपया पोच द्यावी
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत : वरील प्रमाणे |