Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (155.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/12/2016
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) 2016

आरबीआय/2016-17/187
आयडीएमडी.सीडीडी.क्र.1453/14.04.050/2016-17

डिसेंबर 16, 2016

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सर्व प्राधिकृत बँका

महोदय/महोदया,

प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) 2016

भारत सरकारने, अधिसूचना क्र. एसओ 4061(ई) दि. डिसेंबर 16, 2016 अन्वये प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) अधिसूचित केली आहे. ही योजना, टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016 खालील प्रत्येक घोषणाकाराला लागु असेल.

ह्या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

(2) ठेवींसाठीची पात्रता :- टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, 2016 च्या कलम 199 क च्या पोटकलम (1) खाली, अघोषित उत्पन्न घोषित करणा-या कोणत्याही व्यक्तीद्वारे, डिसेंबर 17, 2016 ते मार्च 31, 2017 दरम्यान, ह्या योजनेखाली ठेवी ठेवल्या जाऊ शकतात.

(3) ठेवींचे स्वरुप :- ह्या ठेवी, भारतीय रिझर्व बँकेमधील बाँड्स लेजर खात्यात घोषणाकाराच्या नावे ठेवल्या जाऊ शकतात. घोषणाकाराला फॉर्म 1 च्या नमुन्यात धारण-प्रमाणपत्र दिले जाईल. ह्या योजनेखाली मिळालेली ठेव, रिझर्व बँक, भारत सरकारच्या सार्वजनिक खात्यातील नेमलेल्या/ठरविलेल्या राखीव निधीमध्ये हस्तांतरित करील.

(4) प्राधिकृत बँका (अ) बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (1949 चा 10) लागु असलेल्या कोणत्याही बँकिंग कंपनीद्वारा (ह्यानंतर ह्यांना प्राधिकृत बँका म्हटले आहे), बाँड्स लेजर अकाऊंटच्या स्वरुपात, ह्या ठेवींसाठीचे अर्ज स्वीकारले जातील.

(ब) घोषणापत्र स्वीकारण्यापूर्वी, दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यास ह्या विभागाला मदत व्हावी ह्यासाठी, प्राधिकृत बँक, जमा केलेल्या ठेवीची फॉर्म 5 मध्ये दिलेली माहिती, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार ह्यांचेकडे, पुढील कामकाजाच्या दिवसापूर्वी इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सादर करील.

(फ) प्राधिकृत बँक, ह्या ठेवीचा तपशील भारतीय रिझर्व बँकेच्या कोअर बँकिंग सोल्युशन्स ई-कुबेर मध्ये अपलोड करील.

(ड) भारतीय रिझर्व बँक व प्राधिकृत बँक ह्याबाबत मिळालेली माहिती गोपनीय ठेवतील.

(5) बाँड्स लेजर अकाऊंट मधील वर्गणी व गुंतवणुकीची रीत (अ) ह्या ठेवी सर्व प्राधिकृत बँकांमध्ये स्वीकारल्या जातील.

(ब) ह्या ठेवी शंभर रुपयांच्या पटीत केल्या जातील.

(क) एखाद्या घोषणाकाराने जमा केलेली ठेव, टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना, 2016 च्या कलम 199 क च्या पोटकलम (1) खाली घोषित केलेल्या अघोषित उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी नसेल.

(ड) वरील कलम 199क आयबीआयडी च्या पोटकलम (1) खालील घोषणापत्र सादर करण्यापूर्वी संपूर्ण ठेव एकरकमी भरली जाईल.

(ई) ही ठेव, रोख रकमेने किंवा अशा ठेवी स्वीकारणा-या बँकेच्या नावे चेक किंवा ड्राफ्टने किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरणाने ठेवली जाईल.

(6) ठेवीची परिणामकारक (लागु होणारी) तारीख - बाँड्स लेजर अकाऊंत उघडण्याची तारीख ही, रोख रक्कम भरण्याची तारीख किंवा चेक किंवा ड्राफ्ट वटविला जाण्याची तारीख किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर केल्याची तारीख समजली जाईल.

(7) अर्ज – (अ) ह्या योजनेखाली करावयाचा अर्ज, फॉर्म 2 मध्ये व रक्कम, संपूर्ण नाव, पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन), बँक खात्याचा तपशील (विमोचनाची रक्कम मिळण्यासाठी) आणि घोषणाकाराचा पत्ता स्पष्टपणे निर्देशित करुन केला जाईल - मात्र, घोषणाकाराकडे पॅन नसल्यास त्याने पॅनसाठी अर्ज करुन, अशा पॅन-अर्जाचा तपशील व पोचपावती क्रमांक द्यावा.

(ब) पोट-परिच्छेद (अ) खाली करावयाच्या अर्जासोबत, परिच्छेद 5 च्या पोट-परिच्छेद (क) व (ड) मध्ये दिल्यानुसार, त्याच्या अघोषित उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी नसलेली रोख रक्कम किंवा ड्राफ्ट किंवा चेक (अथवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर) सादर केला जावा.

(8) नामनिर्देशन - (अ) एखाद्या बाँड्स लेजर अकाऊंटचा एकमेव धारक असलेली व्यक्ती किंवा जीवित असलेली एकमेव धारक व्यक्ती, एका किंवा अधिक व्यक्तींचे नामनिर्देशन फॉर्म 3 द्वारा करु शकते. ही/ह्या नामनिर्देशन व्यक्ती, धारक व्यक्तीच्या मृत्युनंतर, बाँड्स लेजर अकाऊंट व त्यावरील प्रदान मिळविण्यास हक्कदार असतील.

(ब) ही रक्कम एक किंवा अधिक नामनिर्देशितांना देय असून, ते प्रदान ड्यु (देय) होण्यापूर्वीच, त्यापैकी कोणा एकाचा, मृत्यु झाल्यास, तो बाँड्स लेजर अकाऊंट जीवित नामनिर्देशितांच्या नावे केला जाईल आणि त्याबाबत देय असलेली रक्कम त्यानुसार दिली जाईल. धारकाच्या मृत्युपूर्वी नामनिर्देशितांचा मृत्यु झाल्यास, तो धारक नवीन नामनिर्देशन करु शकतो.

(क) बाँड लेजर अकाऊंट धारकाने केलेले नामनिर्देशन एक नवीन नामनिर्देशन, प्राधिकृत बँकेला फॉर्म 4 मध्ये लेखी नोटिस देऊन, बदलले किंवा रद्द केले जाऊ शकते.

(ड) धारकाने केलेले प्रत्येक नामानिर्देशन किंवा नामनिर्देशनात केलेला बदल किंवा रद्दीकरण, प्राधिकृत बँकेमार्फत, रिझर्व बँकेकडे पंजीकृत केले जाईल आणि पंजीकरणाच्या तारखेपासूनच ते लागु असेल.

(ई) नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्यास, बाँड्स लेजर अकाऊंट धारक व्यक्ती, तिचा मृत्यु झाल्यास, तो बाँड्स लेजर अकाऊंट किंवा त्याबाबतची रक्कम मिळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची नेमणुक करु शकते.

(9) हस्तांतरणीयता :- ह्या बाँड्स लेजर अकाऊंट्सची हस्तांतरणीयता, धारकाच्या मृत्युनंतर, त्याचा नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारस ह्यांच्या पुरतीच सीमित आहे.

(10) व्याज :- ह्या ठेवींवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

(11) ह्या बाँड्स विरुध्द व्यापार :- हे बाँड्स लेजर अकाऊंट्स व्यापारासाठी वापरता येणार नाहीत.

(12) परतफेड :- ह्या बाँड्स लेजर अकाऊंट्सची परतफेड ठेव ठेवल्याच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण झाल्यावर केली जाईल. परिपक्वता-तारखेच्या पूर्वी अशा बाँड्स लेजर अकाऊंट्सचे विमोचन करण्यास परवानगी नाही.

(13) अर्थांतरण :- ह्या अधिसूचनेमध्ये वापरण्यात आलेल्या परंतु व्याख्या न केल्या गेलेल्या, परंतु आय कर अधिनियम 1961 (1961 चा 43); सरकारी प्रतिभूती अधिनियम 2006 (2006 चा 38) किंवा वित्त अधिनियम 2016 (2016 चा 28) ह्यामध्ये व्याख्या केल्या गेलेल्या शब्दांचे व शब्द समुच्चयांचे अर्थ, वरील अधिनियमांमध्ये त्यांना दिलेल्या अर्थांप्रमाणेच असतील.

आपला विश्वासु,

(राजेंद्र कुमार)
महाव्यवस्थापक

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��