सेक्शन 23, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 - ब्रँच लायसेंसिगवरील महापरिपत्रक - जनगणना माहिती 2011 |
आरबीआय/2016-17/134
डीबीआर.आरआरबी.बीसी.क्र.36/31.01.002/2016-17
नोव्हेंबर 16, 2016
सर्व प्रादेशिक बँका
महोदय/महोदया,
सेक्शन 23, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 - ब्रँच लायसेंसिगवरील महापरिपत्रक - जनगणना माहिती 2011
कृपया आमचे ब्रँच लायसेंसिंगवरील महापरिपत्रक डीबीआर.सीओ.आरआरबी.बीएल.बीसी.क्र.17/31.01.002/2015-16 दि. जुलै 1, 2015 चा संदर्भ घ्यावा. जनगणनेवरील माहिती आता सार्वजनिकरित्या प्रसिध्द झाली असल्याने, सर्व प्रकारच्या वर्गीकरणांसाठी, जनगणना 2011 चा संदर्भ घेण्यास प्रादेशिक ग्रामीण बँकांना सांगण्यात येत आहे. जनगणना 2011 च्या अधिक टायर-निहाय लोकसंख्यागट, कमी बँका असलेल्या राज्यांमधील कमी बँका असलेले जिल्हे व इतर राज्यांमधील कमी बँका असलेले जिल्हे, ह्यांची यादी अनुक्रमे जोडपत्र 1, 2 व 3 मध्ये दिली आहे.
आपला विश्वासु
(एस.एस.बारिक)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक
सोबत : वरील प्रमाणे. |
|