आरबीआय/2016-17/183
डीबीआर.एएमएल.बीसी.48/14.01.01/2016-17
डिसेंबर 15, 2016
सर्व विनियमित संस्था
महोदय/महोदया,
तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील महानिदेशांच्या तरतुदींचे अनुपालन
तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील महानिदेशातील पुढील तरतुदींचा संदर्भ घेण्यात येत आहे.
(1) कलम 8(ड) व (ई) ह्यात निर्देशित करण्यात आले होते की, विनियमित संस्थांच्या (आरई) समवर्ती (काँकरंट/अंतर्गत ऑडिट प्रणालीने, केवायसी/एएमएल धोरणांचे पालन व कायकृतींच्या अनुपालनांची पडताळणी करुन, ऑडिट समितीला, तिमाही धर्तीवर, ऑडिट नोट्स व अनुपालन सादर करणे आवश्यक आहे.
(2) कलम 23 : ह्यात छोटी खाती बाबतच्या कार्यकृतींवरील सूचना देण्यात आल्या आहेत. आणि
(3) कलम 67 : ह्यात सांगण्यात आले आहे की, वेळोवेळी सुधारित केलेल्या आय कर (आयटी) नियम 114 ब (बँकांना लागु असलेल्या) अनुसार, व्यवहार करतेवेळी, ग्राहकांचा पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) घेतला जाऊन तो पडताळला जाईल. पॅन नसलेल्या व्यक्तींकडून फॉर्म 60 घेतला जाईल. येथे स्पष्ट करण्यात येते की, आयटी नियम 114 ब अनुसार व्यवहार ह्या संज्ञेत, बँका, एनबीएफसी इत्यादींमध्ये खाती उघडण्याचाही समावेश आहे.
(2) आरबीआयच्या नजरेस आणण्यात आले आहे की, काही बाबतीत वरील तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची खात्री केली जात नाही. हे विचारात घेऊन आरईंना पुढीलप्रमाणे सांगण्यात येत आहे.
(1) महानिदेशातील कलम 8(ड) व (ई) मध्ये दिल्यानुसार त्यांनी विद्यमान सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
(2) छोट्या खात्यांच्या बाबतीत, विहित केलेल्या मर्यादा/अटींचे उल्लंघन केले जाणार नाही व त्यांच्या अनुपालनावर कडक देखरेख ठेवली जावी. एखाद्या ग्राहकाला, विहित मर्यादेपलिकडे कार्यकृती करावयाच्या असल्यास, महानिदेशाच्या कलम 67 मधील तरतुदी व कलम 16/17 मध्ये दिलेल्या सीडीडी/केवायसी कार्यकृती पूर्ण करण्यासह, सर्वसाधारण खाते उघडतेवेळीच्या आवश्यकता पूर्ण केल्यावरच (ह्यात बँकेत एनबीएफसीत खाते उघडताना पॅन/फॉर्म 60 देण्याचाही समावेश आहे) तसे करण्यास त्या ग्राहकाला परवानगी दिली जाईल. परवानगीप्राप्त मर्यादांबाहेर जमा/शिल्लक असल्याने, छोटे खाते म्हणून वर्गीकरण केले जाण्यासाठी एखादे खाते अपात्र ठरल्यास, खात्याच्या मर्यादांचे उल्लंघन झाले नसल्यास, त्या खात्यातून छोट्या खात्यासाठी विहित केलेल्या मर्यादेमध्ये निकासी करण्यास परवानगी दिली जावी.
(3) केवायसी निकष पूर्ण न केलेल्या, बीएसपीडी खात्यांना, (पीएमजेडीवाय खाती बीएसपीडीए सारखीच आहेत) छोटी खाती म्हणूनच समजण्यात यावे व त्यामुळे त्यांनाही अशा खात्यांच्या मर्यादा लागु होतात. ह्यासाठी, अशा खात्यांमध्ये सर्वसामान्य कार्यकृतींना परवानगी देण्यासाठी, वरील (2) मध्ये दिलेल्या कार्यरीतींचे अनुपालन केले जावे. परवानगीप्राप्त मर्यादांबाहेर जमा/शिल्लक असल्याने, छोटे खाते म्हणून वर्गीकरण केले जाण्यासाठी एखादे खाते अपात्र ठरल्यास, खात्याच्या मर्यादांचे उल्लंघन झाले नसल्यास, त्या खात्यातून छोट्या खात्यासाठी विहित केलेल्या मर्यादेमध्ये निकासी करण्यास परवानगी दिली जावी.
(4) आवश्यक त्या सीडीडी कार्यकृतींचे पालन केले गेले आहे अशा, केवायसी पूर्ण केलेल्या खात्यांच्या बाबतीत, आरईंनी आय कर नियम 114 ब अनुसार, सर्व व्यवहारांसाठी (ज्यात बँका व एनबीएफसी इत्यादीं मध्ये खाती उघडण्याचा समावेश आहे) पॅन देणे/फॉर्म 60 घेणे ह्याबाबतच्या सर्व बाबींचे अनुपालन केले असल्याची खात्री करुन घ्यावी. वरील आवश्यकता पूर्ण न करणा-या खात्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे डेबिट व्यवहार, हस्तांतरण किंवा अन्य व्यवहार करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सुरुवातीलाच, खाली दिलेल्या दोन्ही मर्यादा पूर्ण झाल्या असल्यास हा नियम कठोरतेने लागु करण्यात यावा.
(1) रु. पाच लाख किंवा त्यापेक्षा अधिक शिल्लक
(2) नोव्हेंबर 9, 2016 एकूण जमा रक्कम (ह्यात इलेक्ट्रॉनिक किंवा अन्य रीतींनी जमा रकमा समाविष्ट आहेत) रु. दोन लाखांपेक्षा जास्त आहे.
(3) येथे स्पष्ट करण्यात येते की, ह्या महानिदेशातील कलम 67 च्या तरतुदी, आय कर नियम 114 बी मध्ये दिल्यानुसार, सरकार, वकिलातीचे कार्यालय इत्यादींना दिलेल्या सूट व सवलती व्यतिरिक्त आहेत.
आपली विश्वासु
(लिली वडेरा)
मुख्य महाव्यवस्थापक
|