आरबीआय/2016-17/243
डीजीबीए.जीएडी.क्र.2294/15.04.001/2016-17
मार्च 6, 2017
सर्व एजेन्सी बँका
महोदय/महोदया,
सुवर्ण चलनीकरण योजना
कृपया वरील विषयावरील आमचे महानिदेश क्र.डीबीआर.आयबीडी.क्र.45/23.67.003/2015-16 दि.ऑक्टोबर 22, 2015 (जानेवारी 21, 2016 पर्यंत अद्यावत केलेले) चा संदर्भ घ्यावा. ही योजना कार्यवाहीत आणण्यासाठी आम्ही पुढील सल्ल देत आहोत.
(2) अहवाल पाठविणे, मेळ ठेवणे व लेखा ह्यामध्ये एकसमानता ठेवण्यासाठी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) 1968 च्या व्यवहारांबाबत करत असल्याप्रमाणेच, एजन्सी बँकांनी, सुवर्ण चलनीकरण योजनेचे व्यवहार (म्हणजे, प्राप्ती, प्रदान, दंड, व्याज, चलनीकरणासाठीची दलाली, कार्यकारी आकार इत्यादि), दैनिक धर्तीवर, केंद्रीय लेखा विभाग, रिझर्व बँक येथे ह्याबाबत ठेवलेल्या सरकारी लेखा खात्याकडे थेट पाठवावेत. ह्यासाठी, सुवर्ण चलनीकरण योजनेचे व्यवहार कळविण्यासाठी, आमच्या नागपुर येथील भारतीय रिझर्व बँकेतील केंद्रीय लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था ताबडतोब कराव्यात.
(3) ही योजना कार्यांन्वित करण्यास प्रधिकृत असलेल्या शाखांना सांगण्यात येत आहे की, त्यांनी ह्या योजनेची सविस्तर माहिती त्यांच्या ग्राहकांच्या नजरेस सुयोग्यपणे आणावी.
आपला विश्वासु,
(पार्थ चौधरी)
महाव्यवस्थापक |