आरबीआय/2016-17/245
डीएनबीआर(पीडी) सीसी.क्र.086/03.10.001/2016-17
मार्च 9, 2017
सर्व एनबीएफसी
महोदय/महोदया,
कर्जाचे रोख वाटप
कृपया, अबँकीय वित्तीय कंपनी - सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट नसलेली, ठेवी न स्वीकारणारी कंपनी (रिझर्व बँक) निदेश 2016, आणि अबँकीय वित्तीय कंपनी - सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट ठेवी न स्वीकारणारी कंपनी व ठेवी स्वीकारणारी कंपनी (रिझर्व बँक) निदेश, 2016 च्या परिच्छेद 37(3)(ब) मधील सूचनांचा संदर्भ घ्यावा. त्यात दिल्यानुसार सोन्याविरुध्द रु.1 लाख व त्यापेक्षा अधिक उच्च मूल्याच्या कर्जांचे वाटप चेकनेच करण्यात यावे.
(2) पुनरावलोकन केल्यानंतर, आणि आय कर अधिनियम 1961 च्या कलम 269एसएस व 269टी खाली दिलेल्या नियमांना अनुसरून, वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमांखालील आवश्यकता, सर्व एनबीएफसींना ताबडतोब लागु होतील. आय कर अधिनियम 1961 खाली, सध्या ही संबंधित मर्यादा रुपये वीस हजार आहे.
(3) त्यानुसार, वरील महानिदेशांचा परिच्छेद 37(3)(ब) रद्द केला जात असून, वरील निदेशामधील, अनुक्रमे परिच्छेद 104 व 117 मध्ये वरील तरतुद समाविष्ट करण्यात आली आहे.
(4) सुधारित केलेले - अबँकीय वित्तीय कंपनी - सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट नसलेली, ठेवी न स्वीकारणारी कंपनी (रिझर्व बँक) निदेश 2016, आणि अबँकीय वित्तीय कंपनी - सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट ठेवी न स्वीकारणारी कंपनी व ठेवी स्वीकारणारी कंपनी (रिझर्व बँक) निदेश, 2016. हे निदेश सोबत जोडण्यात आले आहेत.
आपला विश्वासु,
(सी डी श्रिनिवासन)
मुख्य महाव्यवस्थापक |