Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (301.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/03/2017
प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 - स्पष्टीकरण

आरबीआय/2016-17/251
आयडीएमडी.सीडीडी.क्र. 2347/14.04.051/2016-17

मार्च 16, 2017

अध्यक्ष/सीईओ/व्यवस्थापकीय संचालक,
सर्व प्राधिकृत बँका,
(बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 लागु असलेल्या सर्व बँका)

महोदय/महोदया,

प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 - स्पष्टीकरण

कृपया, प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीस), 2016 च्या घोषणेबाबत सरकारने दिलेले पत्र आयडीएमडी.क्र.1451/08.03.016/2016-17 डिसेंबर 16, 2016 आणि आमची अधिसूचना क्र.एस,ओ.4061(ई) दि. डिसेंबर 16, 2016 चा संदर्भ घ्यावा. आमच्या नजरेस आणण्यात आले आहे की, आय कर प्राधिकरणांकडे फॉर्म 5 अपलोड करतेवेळी त्यावर द्यावयाच्या संदर्भ क्रमांकाबाबत, निवेशकांमध्ये स्पष्टता नाही.

सध्या तरी, पीएमजीकेडीएसखाली रकमा स्वीकारताना बँका पोचपावती देतात. त्यानंतर, ह्या ठेवीचा तपशील, ह्या बँकेच्या ई-कुबेर अर्जात भरला जातो व एक ‘सबस्क्रिप्शन पावती’ निर्माण होते. सबस्क्रिप्शन पावती ही सिस्टिम निर्मित पावती असून त्यावर ‘इश्यु रेफरन्स नंबर’ असतो. आय कर प्राधिकरणांकडे फॉर्म 5 अपलोड करण्यापूर्वी, निवेशकांनी हाच संदर्भ क्र. देणे आवश्यक आहे.

ह्यात अधिक स्पष्टता आणण्यासाठी, ई-कुबेरने निर्माण केलेल्या ‘इश्यु रेफरन्स नंबरला’, आता ‘डिपॉझिट रेफरन्स नंबर’ असे नवे नाव देण्यात आले आहे. हा बदल दर्शविण्यासाठी, आरबीआयच्या ई-कुबेर अर्जांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. पीएमजीकेडीएस खालील स्वीकारर्कत्या बँकांच्या कर्मचा-यांनी आणि पीएमजीकेडीएसच्या, 2016 ठेवीदारांनाही ह्याची नोंद घेण्यास सांगण्यात यावे.

आपला विश्वासु,

(ए.मंगलागिरी)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä