आरबीआय/2016-17/256
डीबीआर.क्र.एलईजी.बीसी.55/09.07.005/2016-17
मार्च 24, 2017
सर्व एजन्सी बँका
महोदय/महोदया,
मार्च 25, 2017 ते एप्रिल 1, 2017 पर्यंत सर्व एजन्सी बँका जनतेसाठी सुरु राहणार
भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे की, सरकारी स्वीकार व प्रदान कार्ये करण्यात मदत व्हावी ह्यासाठी, एप्रिल 1, 2017 पर्यंत सर्व दिवशी, सर्व पे अँड अकाऊंट्स कार्यालये सुरु राहतील. त्यानुसार, सर्व एजन्सी बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी, सरकारी व्यवहार पाहणा-या सर्व बँक शाखा, विद्यमान आर्थिक वर्षातील सर्व दिवशी व एप्रिल 1, 2017 रोजी (शनिवार, रविवार, सुट्टीच्या दिवसासह) सुरु ठेवाव्यात.
वरील दिवशी वरील बँकिंग सेवा उपलब्ध असल्याबाबत बँकांनी योग्य ती प्रसिध्दी द्यावी.
आपला विश्वासु,
(राजिंदर कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक. |