आरबीआय/2016-17/259
डीबीआर.क्र.एलईजी.बीसी.56/09.07.005/2016-17
मार्च 29, 2017
सर्व एजन्सी बँका
महोदय/महोदया,
एप्रिल 1, 2017 रोजी, सरकारी व्यवहारांसाठी सर्व एजन्सी बँका सुरु असणे-सुधारित सूचना
परिपत्रक डीबीआर.क्र.एलईजी.बीसी.55/09.07.005/2016-17 दि. मार्च 24, 2017 रोजी आम्ही सर्व एजन्सी बँकांना सांगितले होते की, त्यांनी त्यांच्या, सरकारी व्यवहार करणा-या सर्व शाखा, विद्यमान आर्थिक वर्षामधील सर्व दिवशी आणि एप्रिल 1, 2017 रोजी (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस ह्यासह) सुरु ठेवाव्यात.
(2) ह्या संदर्भात, असे बाजू मांडण्यात आली की, एप्रिल 1, 2017 रोजी बँक शाखा सुरु ठेवल्यामुळे, आणि विशेषतः त्याच तारखेपासून काही बँकांचे विलीनीकरण केले जात असल्यामुळे, वार्षिक क्लोजिंग मध्ये अडथळे/अडचणी येऊ शकतात. ह्यासाठी, भारत सरकारशी सल्लामसलत करुन ठरविण्यात आले आहे की, आधीच सांगितल्याप्रमाणे, सरकारी व्यवहार पाहणा-या सर्व शाखा एजन्सी बँकांनी, विद्यमान आर्थिक वर्षामधील सर्व दिवशी (शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसासह) सुरु ठेवावयाच्या असल्या, तरी ह्या शाखा एप्रिल 1, 2017 रोजी सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही.
आपला विश्वासु,
(राजिंदर कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
|