आरबीआय/2016-17/267
डीजीबीए.जीएडी.2618/15.02.005/2016-17
एप्रिल 6, 2017
अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकासपत्र-2014,
सुकन्या समृध्दी खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना-2014 चे व्यवहार करणा-या एजन्सी बँका.
महोदय,
लघु बचत योजनेसाठीचे व्याज दर
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीजीबीए.जीएडी.2012/15.02.005/2016-17 दि. फेब्रुवारी 9, 2017 चा संदर्भ घ्यावा. भारत सरकारने त्यांचे कार्यालयीन पत्र (ओएम) क्र.एफ.क्र.1/4/2016–एनएस.II दि. मार्च 31, 2017 अन्वये, वित्तीय वर्ष 2017-18 च्या पहिल्या तिमाहीसाठीचे, निरनिराळ्या लघु बचत योजनेवरील व्याजदर कळविले आहेत (सोबत प्रत जोडली आहे).
(2) ह्या परिपत्रकातील मजकुर, सरकारी लघु बचत योजना राबविणा-या आपल्या बँक शाखांना, योग्य ती कारवाई करण्यास कळविण्यात यावा. ह्या योजनांचे वर्गणीदार असलेल्या लोकांच्या माहितीसाठी, वरील मजकुर आपल्या शाखांच्या नोटिस बोर्डावर प्रदर्शित करण्यात यावा.
आपला विश्वासु,
(हर्ष वर्धन)
व्यवस्थापक
सोबत - वरील प्रमाणे. |