आरबीआय/2016-17/292
एफाअयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.28/02.08.001/2016-17
एप्रिल 27, 2017
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सर्व लीड बँका
महोदय/महोदया,
हरयाणा राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती - लीड बँक म्हणून जबाबदारी देणे
राजपत्रातील अधिसूचना दि. डिसेंबर 1, 2016 अन्वये, हरयाणा सरकारने, हरयाणा राज्यात “चरकी दाद्री” नावाच्या एका नवीन जिल्ह्याची निर्मिती अधिसूचित केली होती. ह्या नवीन जिल्ह्याबाबत लीड बँकेची जबाबदारी, पुढीलप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेवर सोपविण्याचे ठरविण्यात आले आहे.
अनु क्र. |
नवनिर्मित जिल्हा |
पूर्वीचा जिल्हा |
नवनिर्मित जिल्ह्याखालील पोट विभाग |
लीड बँकेची जबाबदारी सोपविलेली बँक |
नव्या जिल्ह्याला दिलेल्या डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड |
1 |
भिवानी |
भिवानी |
भिवानी, लोहारु, सिवानी आणि तोशाम |
पंजाब नॅशनल बँक |
359 |
2 |
चरकी दाद्री |
भिवानी |
बध्रा व चरकी दाद्री |
पंजाब नॅशनल बँक |
395 |
(2) ह्याशिवाय, वरील कोष्टकात निर्देशित केल्याप्रमाणे, नवीन जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड, बँकांकडून बीएसआर रिपोर्टिंग करण्यासाठी देण्यात आला आहे.
(3) हरयाणा राज्यामधील इतर जिल्ह्यांच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही.
आपला विश्वासु,
(अजय कुमार मिस्रा)
मुख्य महाव्यवस्थापक
|