आरबीआय/2017-18/21
एफआयडीडी.एमएसएमई अँड एनएफएस.बीसी.क्र.10/06.02.31/2017-18
जुलै 13, 2017
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)
महोदय/महोदया
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणून वर्गीकरण करण्यासाठी, कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुक :- विश्वासपात्र कागदपत्र
कृपया ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला कर्ज’ ह्यावरील आमचे महानिदेश एफआयडीडी.एमएसएमई अँड एनएफएस.3/06.02.31/2016-17 दिनांक जुलै 21, 2016 आणि भारत सरकार नवी दिल्ली येथील एमएसएमई मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचना क्र. एस.ओ.1722(E) दिनांक ऑक्टोबर 5, 2006 चा संदर्भ घ्यावा. ह्या अधिसूचनेच्या परिच्छेद 2 अनुसार, कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुक काढताना, तो कारखाना व यंत्रसामुग्री जुनी असो किंवा नवी असो, केवळ त्यांची मूळ किंमतच हिशेबात घेण्यात यावी.
(2) ह्या संदर्भात, एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार ह्यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र (ओएम) एफ.क्र.12(4)/2017-एसएमई दि. मार्च 8, 2017 अन्वये स्पष्ट केले होते की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणून वर्गीकृत करण्याबाबत, त्या उद्योगाची कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुक पडताळण्यासाठी पुढील कागदपत्रे विश्वासार्ह मानावीत.
(1) कारखाना व यंत्रसामुग्रीच्या खरेदीच्या इनव्हॉईसची प्रत. किंवा
(2) ऑडिटेड अकाऊंट्समधील, कारखाना व यंत्रसामुग्री मधील गुंतवणुकीसाठीचा ग्रॉस ब्लॉक किंवा
(3) कारखाना व यंत्रसामुग्रीच्या खरेदीच्या किंमतीबाबत चार्टर्ड अकाऊंटंटने दिलेले प्रमाणपत्र.
(3) ह्याशिवाय, मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग म्हणून वर्गीकृत करण्यासाठीच्या कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुकीसाठी त्यांची खरेदीची किंमत हिशेबात घेतली जावी - पुस्तकी मूल्य नव्हे.
(खरेदीची किंमत वजा घसारा)
(4) वरील मंत्रालयाने दिलेल्या पत्र ओएम एफ.क्र 12(4) / 2017 – एसएमई दि. मे 31, 2017 अन्वये, वरील तरतुदीची जारी होणारी तारीख ही, एमएसएमईडी अधिनियम 2006 जारी होण्याच्या तारखेपासून असेल व सुरुवातीपासून (प्रॉस्पेक्टिवली) नसेल. ह्याशिवाय, वरील तरतुदी, एमएसएमईडी अधिनियम, 2006 च्या कलम 7(1)(अ) व कलम 7(1)(ब) ह्यांनाही (म्हणजे माल उत्पादन करणा-या व सेवा देणा-याही) लागु असतील.
आपली विश्वासु
(उमा शंकर)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक.
|