आरबीआय/2017-18/60
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.15/02.08.001/2017-18
सप्टेंबर 21, 2017
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व लीड बँका
महोदय/महोदया,
पश्चिम बंगाल राज्यांमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती –
लीड बँकेची जबाबदारी सोपविणे
पश्चिम बंगाल सरकारने राजपत्र अधिसूचना दि. मार्च 20, 2017 अन्वये, पश्चिम बंगाल राज्यात, एप्रिल 4, 2017 पासून ‘झारग्राम’ हा नवीन जिल्हा निर्माणे केल्याचे आणि राजपत्र अधिसूचना दि. मार्च 24, 2017 अन्वये, एप्रिल 7, 2017 पासून ‘पश्चिम बर्धमान’ हा नवीन जिल्हा निर्माण केल्याचे अधिसूचित केले होते. ह्या नवीन जिल्ह्यांच्या लीड बँकेची जबाबदारी खाली दिल्यानुसार ठरविण्यात आली आहे.
अनु क्र. |
नवनिर्मित जिल्हा |
पूर्वीचा जिल्हा |
नवनिर्मित जिल्ह्याचे पोट विभाग |
लीड बँकेची जबाबदारी सोपविलेली बँक |
नव्या जिल्ह्याला दिलेला डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड |
1 |
पश्चिम मेदिनीपुर |
पश्चिम मेदिनीपुर |
मेदिनीपुर सदर, खरगपुर, घातल |
युनायटेड बँक ऑफ इंडिया |
112 |
2 |
झारग्राम |
पश्चिम मेदिनीपुर |
झारग्राम सदर |
युनायटेड बँक ऑफ इंडिया |
398 |
3 |
पूर्व बर्धमान |
पूर्व बर्धमान |
बर्धमान सदर उत्तर, बर्धमान सदर दक्षिण, कटवा, कलना |
युको बँक |
399 |
4 |
पश्चिम बर्धमान |
पूर्व बर्धमान |
असंसोल सदर, दुर्गापुर |
स्टेट बँक ऑफ इंडिया |
403 |
(2) नव्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्स, बँकांतील बीएसआर अहवालातही देण्यात आले आहेत.
(3) पश्चिम बंगाल राज्यामधील इतर जिल्ह्यांच्या लीड बँकांच्या जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही.
आपला विश्वासु,
(अजय कुमार मिस्रा)
मुख्य महाव्यवस्थापक
|