आरबीआय/2017-18/95
डीजीबीए.जीबीडी.क्र.1324/31.02.007/2017-18
नोव्हेंबर 16, 2017
सर्व एजन्सी बँका
महोदय/महोदया,
जीएसटी मिळालेल्या व्यवहारांसाठी एजन्सी कमिशन
कृपया एजन्सी कमिशनचा दावा करण्यासंबंधाने असलेल्या, जुलै 1, 2017 रोजीच्या व एजन्सी बँकांकडून सरकारी व्यवसाय चालविणे - एजन्सी कमिशनचे प्रदान ह्यावरील आमच्या महापरिपत्रकाच्या परिच्छेद 15 चा संदर्भ घ्यावा.
(2) जीएसटीच्या साचाची अंमलबजावणी केल्यानंतर, वरील महापरिपत्रकाचा परिच्छेद 15 बदलण्याचे ठरविण्यात आले. हा सुधारित परिच्छेद 15 पुढीलप्रमाणे असेल.
‘एजन्सी बँकांनी, केंद्र सरकार संबंधित व्यवहारांसाठीच्या कमिशनचे त्याचे दावे, विहित केलेल्या नमुन्यात, सीएएस नागपुर ह्यांचेकडे सादर करावेत, आणि राज्य सरकार संबंधित व्यवहारांसाठीच्या कमिशनचे दावे, भारतीय रिझर्व बँकेच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयांकडे सादर करावेत. तथापि, जीएसटी मिळालेल्या व्यवहारांसाठीचे एजन्सी दावे, फक्त, रिझर्व बँकेच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातच समायोजित केले जातील. आणि त्यानुसार, जीएसटी गोळा करण्यास प्राधिकृत असलेल्या सर्व एजन्सी बँकांना सांगण्यात येते की त्यांनी, त्यांचे जीएसटी मिळाल्याच्या व्यवहारांबाबतच्या एजन्सी कमिशनचे सर्व दावे, केवळ मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाकडेच सादर करावेत. सर्व एजन्सी बँकांद्वारे, एजन्सी कमिशन मिळविण्यासाठीच्या दाव्यांचे नमुने, आणि शाखा-अधिकारी व सनदी लेखापालांनी सही करावयाच्या प्रमाणपत्रांचे वेगळ्याने असलेले संच, जोडपत्र 2 मध्ये दिले आहेत. पेन्शनच्या कोणत्याही थकबाकी जमा करणे शिल्लक नाही/नियमित पेन्शन जमा करण्यात/पेन्शनची थकबाकी जमा करण्यात कोणताही विलंब झाला नाही ह्या अर्थाच्या ईडी/सीजीएमने (सरकारी व्यवहारांचा प्रभारी) द्यावयाच्या प्रमाणपत्राव्यतिरिक्तही, अशी प्रमाणपत्रे देणे आवश्यक असेल’.
(3) वरील महापरिपत्रकातील इतर सर्व सूचनांमध्ये कोणताही बदल नाही.
आपला विश्वासु,
(पार्थ चौधुरी)
महाव्यवस्थापक |