आरबीआय/2017-18/111
डीजीबीए.जीबीडी/1616/15.02.005/2017-18
डिसेंबर 21, 2017
सर्व एजन्सी बँका
महोदय/महोदया,
एजन्सी बँकांकडून सरकारांच्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी
आमच्या असे निदर्शनास आणण्यात आले आहे की, काही एजन्सी बँका, त्यांना आरबीआयकडून पुढील सूचना/संदेश मिळाले नसल्याचे कारण सांगून, सरकारने (केंद्रीय तसेच राज्य सरकारे) दिलेल्या सूचनांची/अधिसूचनांची त्वरित अंमलबजावणी करत नाहीत.
(2) ह्या संदर्भात सर्व एजन्सी बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी आरबीआयकडून पुढील सूचना येण्याची वाट न पाहता, सरकारच्या (केंद्र तसेच राज्य सरकारे) निरनिराळ्या अधिसूचनांमध्ये दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वे/सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे, आणि ताबडतोब आवश्यक ती कारवाई करावी.
(3) ह्याशिवाय असेही सांगण्यात येते की, अशा मार्गदर्शक तत्वे/सूचनांशी संबंधित त्यांना असलेले प्रश्न एजन्सी बँकांनी, संबंधित सरकारांशी संपर्क करुन थेट पाठवावेत आणि ते प्रश्न आरबीआयकडे कळविण्याबाबत असल्यास, ते डीजीबीए/सीएएस नागपुर ह्यांचेकडे पाठवावेत.
आपला विश्वासु,
(पार्थ चौधुरी)
महाव्यवस्थापक |