आरबीआय/2017-2018/191
डीबीआर.डीईए फंड सेल.बीसीएनओ.110/30.01.002/2017-18
जून 7, 2018
व्यवस्थापकीय संचालक व सीईओ/
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबीसह),
स्थानिक क्षेत्रीय बँका (एलएबी),
नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,
लघु वित्त बँका/पेमेंट्स बँका
महोदय/महोदया,
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 - कलम 26 अ
ठेवीदार शिक्षण व जाणीव निधी योजना 2014 – कार्यकारी मार्गदर्शक तत्वे - व्याजाचे प्रदान
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीबीओडी.क्र.डीईए फंड सेल. बीसी.126/30.01.002/2013-14 दि. जून 26, 2014 चा संदर्भ घ्यावा. त्यात रिझर्व बँकेने विहित केले होते की, डीईए निधीमध्ये हस्तांतरित केल्या गेलेल्या व हक्क न सांगितल्या गेलेल्या, व्याज देय असलेल्या रकमांवर ठेवीदार/हक्कदार ह्यांना देय असलेल्या व्याजाचा दर, पुढील सूचना दिली जाईपर्यंत, दरसाल सरळ व्याजाने 4% असेल.
(2) ह्या व्याज दराचे पुनरावलोकन करण्यात आले असून, असे ठरविण्यात आले आहे की, वरील निधीमध्ये हस्तांतरित झालेल्या, हक्क न सांगितल्या गेलेल्या व्याज देय रकमांवर, ठेवीदार/हक्कदार ह्यांना द्यावयाचा व्याजदर, जुलै 1, 2018 पासून, सरळ व्याजाने दरसाल 3.5% असेल. जुलै 1, 2018 रोजी किंवा त्यानंतर मिळालेल्या सर्व दाव्यांची तडजोड, पुढील सूचना दिली जाईपर्यंत वरील दरानेच केली जाईल.
(3) जून 26, 2014 रोजीच्या परिपत्रकातील इतर मजकुरात कोणताही बदल नाही.
आपला विश्वासु,
(प्रकाश बालियारसिंग)
मुख्य महाव्यवस्थापक |