आरबीआय/2018-19/88
डीजीबीए.जीबीडी.क्र.1397/15.01.001/2018-19
डिसेंबर 6, 2018
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
स्पेशल डिपॉझिट स्कीम (एसडीएस) 1975 हाताळणा-या एजन्सी बँका
महोदय,
स्पेशल डिपॉझिट स्कीम (एसडीएस) - 1975
कॅलेंडर वर्ष 2018 साठी व्याजाचे प्रदान
आम्ही येथे सांगु इच्छितो की एसडीएस 1975 साठीच्या व्याजदरांसंबंधित राजपत्रित अधिसूचना भारत सरकारच्या वेबसाईटवर egazette.nic.in उपलब्ध असून त्यांचा मार्गदर्शनासाठी उपयोग करता येईल. 2018 सालासाठी, एसडीएस 1975 साठीचे व्याज, राजपत्रात निर्देशित केलेल्या दरांनी खातेधारकांना दिले जात आहे ह्याची आपण खात्री करुन घ्यावी.
(2) येथे सांगण्यात येते की, कॅलेंडर वर्ष 2018 साठीचे व्याज, आमचे परिपत्रक सीओ.डीटी.क्र.15.01.001/एच-3527/2003-04 दि. डिसेंबर 30, 2003 मध्ये देण्यात आलेल्या, सध्या लागु असलेल्या अटींनुसार, जानेवारी 1, 2019 रोजीच शक्यतो इलेक्ट्रॉनिक रितीनेच एसडीएस खातेदारांना दिले जावे.
(3) कृपया आपल्या सर्व ठेव-कार्यालयांना सुयोग्य सूचना द्याव्यात.
आपला विश्वासु,
(ए.सिध्दार्थ)
व्यवस्थापक |