आरबीआय/2018-19/147
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.16/02.01.001/2018-19
मार्च 25, 2019
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व सीईओ
एसएलबीसी/युटीएलबीसी निमंत्रक बँका
महोदय/महोदया,
एसएलबीसी/युटीएलबीसीचे निमंत्रकपद देणे - गुजरात राज्य आणि दीव व दमण आणि दादरा व नगरहवेली केंद्रशासित प्रदेश.
भारतीय राजपत्र अधिसूचना जी.एस.आर. 2(ई) दि. जानेवारी 2, 2019 अन्वये, विजया बँक व देना बँक ह्यांचे बँक ऑफ बडोदा बरोबर केलेले एकत्रीकरण अधिसूचित करण्यात आले आहे. ‘विजया बँक व देना बँक ह्यांचे बँक ऑफ बडोदा बरोबर केलेले एकत्रीकरण योजना, 2019’ ह्या नावाची अधिसूचना, एप्रिल 1, 2019 रोजी जारी होत आहे.
(2) वरील बाब विचारात घेता, गुजरात राज्यासाठीचे एसएलबीसी निमंत्रकपद, आणि दमण व दीव, आणि दादरा व नगरहवेली ह्या केंद्रशासित प्रदेशासाठीचे युटीएलबीसी निमंत्रकपद, बँक ऑफ बडोदाला देण्याचे ठरविण्यात आले आहे.
(3) इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या एसएलबीसी/युटीएलबीसी निमंत्रकपदामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आपला विश्वासु,
(गौतम प्रसाद बोराह)
मुख्य महाप्रबंधक-इन-चार्ज
|