Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (227.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/04/2019
लीड बँकेची जबाबदारी देणे

आरबीआय/2018-19/158
एफ आय डी डी सीओ.एलबीएस.बीसी.17/02.08.001/2018-19

एप्रिल 1, 2019

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व लीड बँका

महोदय/महोदया,

लीड बँकेची जबाबदारी देणे

विजया बँक आणि देना बँक ह्यांचे बँक ऑफ बडोदा मध्ये एकत्रीकरण केले जाण्याबाबत, भारतीय राजपत्र अधिसूचना जी एस आर.2 (ई) दि. जानेवारी 2, 2019 अन्वये अधिसूचित करण्यात आले आहे. ‘अॅमलगमेशन ऑफ विजया बँक अँड देना बँक विथ बँक ऑफ ऑफ बडोदा योजना 2019’ एप्रिल 1, 2019 पासून जारी झाली आहे.

(2) वरील बाब विचारात घेता, विजया बँक व देना बँक ह्यांनी ह्यापूर्वी घेतलेल्या जिल्ह्यांसाठी लीड बँक जबाबदारी देण्याबाबत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, लीड बँकेची जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.

अनु क्र. राज्य / केंद्रशासित प्रदेश आधीची लीड बँक जिल्हा लीड बँक जबाबदारी
1 छत्तीसगड देना बँक i) बालोद बँक ऑफ बडोदा
      ii) धमतरी
      iii) दुर्ग
      iv) गरियाबंद
      v) महासमुंद
      vi) रायपूर
      vii) राजनांदगाव
2 गुजरात देना बँक i) अहमदाबाद स्टेट बँक ऑफ इंडिया
      ii) अरावली बँक ऑफ बडोदा
      iii) बनसकांठा  
      iv) बोटाड
      v) देवभूमी द्वारका  
      vi) गांधीनगर स्टेट बँक ऑफ इंडिया
      vii) कच्छ (भुज) बँक ऑफ बडोदा
      viii) मेहसाना
      ix) पाटण
      x) साबरकांठा
3 कर्नाटक विजया बँक i) धारवाड बँक ऑफ बडोदा
      ii) हवेरी
      iii) मांड्या
4 दादरा आणि नगर हवेली देना बँक i) दादरा आणि नगर हवेली बँक ऑफ बडोदा

(3) देशामधील इतर जिल्ह्यांच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही.

आपला विश्वासु

(गौतम प्रसाद बोराह)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä