आरबीआय/2018-19/218
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.19/02.08.001/2018-19
जून 20, 2019
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व लीड बँका
महोदय/महोदया,
तेलंगणा व मध्यप्रदेश ह्या राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँक जबाबदारी देणे
तेलंगणा सरकारने राजपत्र अधिसूचना जी. ओ. एमएस. क्र. 18 व 19 दिनांक फेब्रुवारी 16, 2019 अन्वये, तेलंगणा राज्यात दोन नवीन जिल्हे निर्माण केल्याचे अधिसूचित केले होते आणि मध्यप्रदेश सरकारने राजपत्र अधिसूचना एफ-1-9-2018-VII-6 दि. सप्टेंबर 29, 2018 अन्वये, मध्यप्रदेश राज्यात एक नवीन जिल्हा निर्माण केल्याचे अधिसूचित केले होते. ह्या नवीन जिल्ह्यांची लीड बँक जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्याचे ठरविण्यात आले आहे.
अनु.क्र. |
राज्य |
नवनिर्मित जिल्हा |
पूर्वीचा जिल्हा |
नवनिर्मित जिल्ह्या खालील राजस्व विभाग/तालुके |
लीड बँक जबाबदारी दिलेली बँक |
नवीन जिल्ह्याला दिलेला डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड |
1 |
तेलंगणा |
मुलुगु |
जयशंकर भूपालपल्ली |
मुलुगु राजस्व विभाग |
भारतीय स्टेट बँक |
00A |
2 |
तेलंगणा |
नारायणपेट |
महबूबनगर |
नारायणपेट राजस्व विभाग |
भारतीय स्टेट बँक |
00B |
3 |
मध्यप्रदेश |
निवारी |
टिकमगढ |
पृथ्वीपुर, निवारी व ओर्चा तहसीली |
भारतीय स्टेट बँक |
00C |
(2) ह्याशिवाय, बँकांकडून बीएसआर पाठविण्यासाठी, नव्या जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्सही ठरविण्यात/देण्यात आले आहेत.
(3) तेलंगाणा आणि मध्य प्रदेश राज्यातील पूर्वीच्या व इतर जिल्ह्यांच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही.
आपला,
(गौतम प्रसाद बोराह)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |