भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेशन - दिल्ली स्टेट को-ऑपरेटिव बँक लि., दिल्ली |
आरबीआय/2018-19/211
डीसीबीआर.आरसीबीडी.बीसी.क्र.11/19.51.025/2018-19
जेष्ठ 12, 1941
जून 12, 2019
सर्व राज्य सहकारी बँका/
केंद्रीय सहकारी बँका
महोदय/महोदया,
भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेशन - दिल्ली स्टेट को-ऑपरेटिव बँक लि., दिल्ली.
येथे कळविण्यात येते की, भारतीय राजपत्र (साप्ताहिक क्र.21 - भाग 3 - विभाग 4) दि. मे 25 - मे 31, 2019) मध्ये प्रसिध्द केलेल्या अधिसूचना डीसीबीआर.सीओ.आरसीबीडी.क्र.02/19.51.025/2018-19 दि. एप्रिल 1, 2019 अन्वये ‘दिल्ली स्टेट को-ऑपरेटिव बँक लि., दिल्ली’ ह्यांचे नाव भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
आपला,
(नीरज निगम)
मुख्य महाव्यवस्थापक |
|