Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (159.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 02/08/2019
वित्तीय समायोजन - बँकिंग सेवा मिळविणे - पायाभूत बचत बँक ठेव खाते (बीएसबीडीए)

आरबीआय/2019-20/31
डीसीबीआर.बीपीडी (पीसीबी/आरसीबी).सीआयआर.क्र.02/13.01.000/2019-20

ऑगस्ट 2, 2019

मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँका
सर्व राज्य/केंद्रीय सहकारी बँका

महोदय/महोदया,

वित्तीय समायोजन - बँकिंग सेवा मिळविणे - पायाभूत बचत बँक ठेव खाते (बीएसबीडीए)

कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक युबीडी.बीपीडी.सीआयआर.क्र.5/13.01.000/2012-13 दि. ऑगस्ट 17, 2012 व परिपत्रक आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.बीसी.क्र.24/07.38.01/2012-13 दि. ऑगस्ट 22, 2012 चा संदर्भ घ्यावा.

(2) पायाभूत बचत बँक ठेव (बीएसबीडी) खाते, अशी खाती ठेवणारांना काही विशिष्ट सुविधा निःशुल्क देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. अधिक चांगली ग्राहकसेवा देण्याच्या हेतूने, ह्या खात्याशी संबंधित सुविधांमध्ये काही बदल करण्याचे ठरविण्यात आले. बँकांना आता सांगण्यात येते की त्यांनी, कोणत्याही किमान शिल्लक रकमेची आवश्यकता न ठेवता, बीएसबीडी खात्यात पुढील किमान सुविधा निःशुल्क द्याव्यात.

(1) बँकेच्या शाखेत तसेच एटीएम/सीडीएम मध्ये रोख रक्कम जमा करणे.

(2) कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वाहिनीमार्फत किंवा केंद्र/राज्य सरकारच्या एजन्सीज् व विभाग ह्यांनी काढलेले चेक्स जमा करुन/गोळा करुन पैसे मिळविणे/जमा करणे.

(3) एका महिन्यात केलेल्या ठेवींचे मूल्य व संख्या ह्यावर कोणतीही मर्यादा न ठेवणे.

(4) एटीएमद्वारे निकासींसह महिन्यातून किमान चार वेळा निकासी करता येणे.

(5) एटीएम कार्ड किंवा एटीएम कम डेबिट कार्ड

हे बीएसबीडी खाते, सर्वांनाच उपलब्ध असलेली एक नेहमीची बँकिंग सेवा समजली जाईल.

(3) वरील किमान सुविधांच्या व्यतिरिक्त बँका, चेकबुक देणे ह्यासह अतिरिक्त मूल्यावर्धित सेवा देऊ शकतात व त्या सुविधांसाठी शुल्क लावले किंवा न लावले जाऊ शकते (कोणताही भेदभाव न करता) परंतु त्यासाठी प्रकटीकरण आवश्यक आहे. अशा अतिरिक्त सुविधा उपलब्ध करुन घेणे ग्राहकांनी निवडलेल्या पर्यायानुसार असेल. तथापि, अशा अतिरिक्त सेवा देतेवेळी, ग्राहकांनी किमान शिल्लक ठेवणे बँकांसाठी आवश्यक नाही. विहित केलेल्या किमान सेवा दिल्या जात असेपर्यंत अशा अतिरिक्त सेवा देण्याने ते खाते नॉन-बीएसबीडी खाते होणार नाही.

(4) बीएसबीडी खाते ठेवणारे ग्राहक, त्या बँकेत अन्य कोणतेही बचत बँक ठेव खाते उघडण्यास पात्र नसतील. एखाद्या ग्राहकाचे त्या बँकेत अन्य कोणतेही बचत बँक ठेव खाते विद्यमान असल्यास, त्याने/तिने, बीएसबीडी खाते उघडण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ते खाते बंद करणे आवश्यक आहे. ह्याशिवाय, बीएसबीडी खाते उघडण्यापूर्वी, त्या ग्राहकाचे अन्य कोणत्याही बँकेत बीएसबीडी खाते नसल्याचे घोषणापत्र बँकेने घ्यावे.

(5) बीएसबीडी खात्याला ‘महानिर्देश - तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्देश, 2016’ वर, वेळोवेळी सुधारित केलेल्या, महानिर्देश डीबीआर.एएमएल.बीसी.क्र.81/14.01.001/2015-16 दि. फेब्रुवारी 25, 2016 अन्वये देण्यात आलेल्या, बँक खाती उघडण्यासाठी असलेल्या, केवायसी/एएमएल वरील आरबीआयने दिलेल्या सूचनांच्या अटी लागू असतील.

(6) परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.316/02.10.002/2014-15 दि. ऑगस्ट 14, 2014 व डीपीएसएस.सीओ. पीडी. क्र.659/02.10.002/2014-15 दि. ऑक्टोबर 10, 2014 अन्वये स्वतःच्या/इतर बँकेच्या एटीएममध्ये सर्वसाधारण बचत बँक खात्यासाठी उपलब्ध असलेल्या निःशुल्क व्यवहारांवर दिलेल्या सूचना बीएसबीडी खात्यांना लागु नाहीत. बीएसबीडी खाते धारकांना उपलब्ध असलेल्या निःशुल्क निकासी सर्व एटीएम्सवर (स्वतःची बँक/इतर बँकांची (एटीएम्स) केल्या जाऊ शकतात.

(7) हे परिपत्रक, ‘वित्तीय समावेशन - बँक सेवा मिळविणे - पायाभूत बचत बँक खाते’ वरील परिपत्रक युबीडी.बीपीडी. सीआयआर. क्र. 5/13.01.000/2012-13 दि. ऑगस्ट 17, 2012 आणि आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.बीसी.क्र 24/07.38.01/2012-13 दि. ऑगस्ट 22, 2012 व ‘वित्तीय समावेशन - पायाभूत बचत बँक खाते - बँकिंग सेवा मिळविणे’ युबीडी.बीपीडी (पीसीबी) सीआयआर.क्र.35/13.01.000/2013-14 दि. ऑक्टोबर 31, 2013 आणि - पायाभूत बचत बँक खाते (बीएसबीडीए) - एफएक्युज्’ वरील परिपत्रक डीबीओडी.क्र.एलईजी.बीसी.52/09.07.005/2013-14 दि. सप्टेंबर 17, 2013 रद्दबातल करते.

(8) ह्या सूचना सप्टेंबर 1, 2019 पासून जारी होतील. ह्याबाबत संचालक मंडळाने मंजुर केलेले धोरण/कार्यकारी रीती तयार करण्यास बँकांना सांगण्यात येत आहे.

आपला,

(नीरज निगम)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä