आरबीआय/2019-20/94
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र. 14/02.08.001/2019-20
नोव्हेंबर 8, 2019
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व लीड बँका
महोदय/महोदया,
मिझोराम राज्यात नवीन जिल्हे निर्माण करणे –
लीड बँकेची जबाबदारी सोपविणे
मिझोराम सरकारने, राजपत्र अधिसूचना ए.60011/21/95-जीएडी/पीटी दि. सप्टेंबर 12, 2008 अन्वये व त्यानंतरच्या संबंधित अधिसूचना दि. जुलै 4, 2019 व ऑगस्ट 9, 2019, मिझोराम राज्यात तीन नवीन जिल्हे निर्माण केल्याचे अधिसूचित केले आहे. ह्या नव्या जिल्ह्यांची लीड बँक जबाबदारी पुढीलप्रमाणे सोपविण्याचे ठरविण्यात आले आहे.
अनुक्रमांक |
नवनिर्मित जिल्हा |
पूर्वीचा जिल्हा (जिल्हे) |
लीड बँक जबाबदारी दिलेली बँक |
नवीन जिल्ह्याला दिलेला डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड. |
1 |
सैतुअल |
(i) आईझॉल
(ii) चंफाई |
भारतीय स्टेट बँक |
00E |
2 |
खावझॉल |
(i) चंफाई
(ii) सेरछिप, |
भारतीय स्टेट बँक |
00G |
3 |
न्हाहथिल |
लुंग्लेंई |
भारतीय स्टेट बँक |
00F |
(2) ह्याशिवाय, बँकांकडून बीएसआर पाठविण्यासाठी, नव्या जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्सही ठरविण्यात/देण्यात आले आहेत.
(3) मिझोराम राज्यातील पूर्वीच्या व इतर जिल्ह्यांच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही.
आपला,
(गौतम प्रसाद बोराह)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |