आरबीआय/2020-21/42
डीओआर.बीपी.बीसी.क्र.15/21.06.201/2020-21
29 सप्टेंबर, 2020
सर्व वाणिज्य बँका
(लघु वित्त बँका, पेमेंट बँका, आरआरबी आणि एलएबी वगळता)
महोदय/महोदया,
बेसेल III भांडवली विनियम :- संक्रमणात्मक व्यवस्थांचा आढावा.
कृपया, ‘बेसेल III भांडवली विनियम :- संक्रमणात्मक व्यवस्थांचा आढावा’ वरील परिपत्रक डीओआर.बीपी.बीसी.क्र.45/21.06.201/2019-20 दि. मार्च 27, 2020 चा संदर्भ घ्यावा.
(2) कोविड-19 च्या सततचे ताणतणाव विचारात घेऊन असे ठरविण्यात आले आहे की, कॅपिटल कंर्झव्हेशन बफरच्या (सीसीबी) 0.625 टक्के शेवटच्या हप्त्याची अंमलबजावणी, सप्टेंबर 30, 2020 पासून एप्रिल 1, 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात यावी. त्यानुसार, ‘बेसेल 3 भांडवली विनियम’ वरील महापरिपत्रक, डीबीआर.क्र.बीपी.बीसी.1/21.06.201/2015-16 दि. जुलै 1, 2015 च्या विभाग ड च्या परिच्छेद 15.2.2 मधील किमान भांडवली कंर्झव्हेशन गुणोत्तरे, एप्रिल 1, 2021 रोजी सीसीबीचा स्तर 2.5 टक्के येईपर्यंत लागु असणे सुरुच राहील.
(3) अतिरिक्त टायर 1 च्या संलेखांच्या (परपेच्युअल अपरिवर्तनीय प्रिफरन्स शेअर्स व परपेच्युअल कर्ज संलेख) रुपांतरण/राईट डाऊन द्वारा नोटा समावून घेण्यासाठीचे पूर्व-विहित ट्रिगर हे, जोखीम भारित अॅसेट्सच्या (आर डब्ल्यु ए) 5.5% राहतील व एप्रिल 1, 2021 पासून आर डब्ल्यु ए च्या 6.125% पर्यंत वाढतील.
आपली विश्वासु,
(उषा जानकीरामन)
मुख्य महाव्यवस्थापक |