Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (157.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/08/2020
बेसेल 3 भांडवली विनियम : डेट म्युच्युअल फंड/ईएफटी बाबतची वर्तणुक

आरबीआय/2020-21/18
डीओआर.क्र.बीपी.बीसी/5/21.04.201/2020-21

ऑगस्ट 6, 2020

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(स्थानिक क्षेत्रातील बँका वगळता
आणि प्रादेशिक ग्रामीण बँका)

महोदय/महोदया,

बेसेल 3 भांडवली विनियम : डेट म्युच्युअल फंड/ईएफटी बाबतची वर्तणुक

कृपया बेसेल 3 भांडवली विनियमांवरील आमचे परिपत्रक डीबीआर.क्र.बीपी.बीसी.1/21.06.201/2015-16 दि. जुलै 1, 2015 चा संदर्भ घ्यावा.

(2) ह्या परिपत्रकाच्या परिच्छेद 8.4.1 अनुसार, इक्विटीज्साठीचा भांडवली आकार म्युच्युअल फंडांच्या युनिट्सना देखील लागु आहे. आता असे ठरविण्यात आले आहे की (1) केंद्रीय, राज्य व विदेशी केंद्रीय सहकारांचे बाँड्स (2) बँकेचे बाँड्स व (3) कॉर्पोरेट बाँड्स (बँक बाँड्स सोडून अन्य) ह्यांच्या स्वरुपात, डेट म्युच्युअल फंड/एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) ह्यामध्ये गुंतवणुक करणा-या बँका, मार्केट जोखमीसाठीचा भांडवली आकार पुढीलप्रमाणे काढतील :

(अ) संपूर्ण कॉन्स्टिट्युअंट कर्ज माहिती उपलब्ध असलेल्या डेट म्युच्युअल फंड/ईटीएफ मध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी, साध्य असल्यानुसार 9% सर्वसाधारण मार्केट जोखीम आकार लागु असेल. निरनिराळ्या प्रकारच्या एक्सपोझर्स साठीचे विशिष्ट जोखीम भांडवली आकार खाती दिल्यानुसार लागु असतील.

अनु. क्र डेट सिक्युरिटीजचे/देणाराचे स्वरुप अनुसरण्याचे कोष्टक
(तपशील जोडपत्रात)
केंद्रीय राज्य व विदेशी केंद्रीय सरकारांचे बाँड्स कोष्टक 16 - विभाग ब
बँकांचे बाँड्स कोष्टक 16 - विभाग ड
कॉर्पोरेट बाँड्स (बँक बाँड्स सोडून अन्य) कोष्टक 16 - विभाग ई (2)

(ब) वरील कर्ज संलेखांचे मिश्रण असलेल्या डेट म्युच्युअल फंड/ईटीएफच्या बाबतीत मात्र, विशिष्ट जोखीम भांडवली आकार हा, सर्वात कमी दर्जा असलेला कर्ज संलेख/त्या फंडातील सर्वोच्च विशिष्ट भांडवली आकार असलेला संलेख ह्यावर आधारित काढला जाईल.

(क) कॉन्स्टिट्युएंट कर्ज माहिती, किमान प्रत्येक महिना अखेर उपलब्ध नसलेल्या डेट म्युच्युअल फंड/ईटीएफ ह्यांना, बेसेल 3 भांडवली विनियमांवरील महापरिपत्रकाच्या परिच्छेद 8.4.1 मध्ये विहित केल्यानुसार, मार्केट जोखमीसाठी भांडवली आकाराचे गणन करण्यासाठी, इक्विटी समान (अॅट पार) वर्तणुक दिली जाईल.

आपला विश्वासु,

(सौरव सिन्हा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक


जोडपत्र

कोष्टक 16 - विभाग ब - भारतीय व विदेशी सत्तांनी/सरकारांनी दिलेल्या सिक्युरिटीजसाठी विशिष्ट जोखीम भांडवली आकार.
अनुक्रमांक गुंतवणुकीचे स्वरुप अवशिष्ट परिपक्वता विशिष्ट जोखीम भांडवल (एक्सपोझरचे %)
(अ) भारतीय केंद्र सरकार व राज्य सरकारे
1 केंद्र व राज्य सरकारांच्या सिक्युरिटीजमधील गुंतवणुक. सर्व 0.00
2 केंद्र सरकारने हमी दिलेल्या इतर मंजुरीप्राप्त सिक्युरिटीजमधील गुंतवणुक सर्व 0.00
3 राज्य सरकारने हमी दिलेल्या इतर मंजुरीप्राप्त सिक्युरिटीजमधील गुंतवणुक. सर्व 1.80
4 केंद्र सरकारने व्याजाचे प्रदान व मुद्दलाची परतफेड ह्यासाठी हमी दिलेल्या इतर सिक्युरिटीज मधील गुंतवणुक. सर्व 0.00
5 राज्य सरकारने व्याजाचे प्रदान व मुद्दलाची परतफेड ह्यासाठी हमी दिलेल्या इतर सिक्युरिटीज मधील गुंतवणुक. सर्व 1.80
(ब) विदेशी केंद्र सरकारे
1 एएए ते एए सर्व 0.00
2 सर्व 1.80
3 बी बी बी सर्व 4.50
4 बी बी ते बी सर्व 9.00
5 बी पेक्षा कमी सर्व 13.50
6 रेटिंग दिलेले नाही (अनरेटेड) सर्व 9.00

कोष्टक 16 - विभाग ड - बँकांनी दिलेल्या बाँड्ससाठी विशिष्ट जोखीम भांडवली आकार.
  विशिष्ट जोखीम भांडवली आकार (%)
  सर्व अनुसूचित बँका (वाणिज्य, प्रादेशिक ग्रामीण बँका, स्थानिक क्षेत्रीय बँका, व सहकारी बँका) सर्व अन-अनुसूचित बँका (वाणिज्य, प्रादेशिक ग्रामीण बँका, स्थानिक क्षेत्रीय बँका व सहकारी बँका)
निवेश करणा-या बँकेचे, लाग असलेल्या भांडवली कंझर्वेशन बफर (सीसीबी) % सह, सामान्य इक्विटी टायर 1 भांडवलाचा (सीईटी 1) स्तर (लागु असेल तेथे) परिच्छेद 5.6.1 (1) मध्ये संदर्भित भांडवली संलेखांमध्ये (इक्विटी सोडून अन्य) केलेल्या गुंतवणुकी. इतर सर्व दावे परिच्छेद 5.6.1 (1) मध्ये संदर्भित भांडवली संलेखांमध्ये (इक्विटी सोडून अन्य) केलेल्या गुंतवणुकी. इतर सर्व दावे
1 2 3 4 5
लागु असलेले किमान सीईटी 1 + लागु असलेला सीसीबी व त्यापेक्षा जास्त 11.25 1.8 11.25 11.25
लागु असलेले किमान सीईटी 1 + सीसीबी = 75% व लागु असलेल्या सीसीबीच्या < 100%. 13.5 4.5 22.5 13.5
लागु असलेला किमान सीईटी 1 + सीसीबी = 50% व लागु सीसीबीच्या < 75%. 22.5 9 31.5 22.5
लागु असलेला किमान सीईटी 1 + सीसीबी = 0% व लागु सीसीबीच्या < 50%. 31.5 13.5 56.25 31.5
लागु असलेल्या किमान मूल्यापेक्षा कमी किमान सीईटी 1 56.25 56.25 पूर्ण वजावट * 56.25
* वजावट ही सामान्य ईक्विटी टायर 1 भांडवलामधून केली जावी.

कोष्टक 16 - विभाग ई (2) - कॉर्पोरेट बाँड्ससाठी (बँक बाँड्स सोडून अन्य) विशिष्ट जोखीम भांडवली आकार.
ईसीएआयने केलेले रेटिंग* विशिष्ट जोखीम भांडवली आकार (%)
एएए 1.8
एए 2.7
4.5
बी बी बी 9.0
बी पेक्षा कमी 13.5
रेटिंग दिलेले नाही (अनरेटेड) 9.0
* ही रेटिंग्ज भारतीय रेटिंग एजन्सीजनी/ईसीएआयने किंवा विदेशी रेटिंग एजन्सीजनी दिलेली रेटिंग्ज् दर्शवितात. विदेशी ईसीएआयच्या बाबतीत येथे वापरण्यात आलेले रेटिंग सिंबॉल्स, स्टँडर्ड व पुअर समजले जावेत ‘+’ व ‘-’ हे मॉडिफायर्स रेटींग वर्गाबरोबर अंतर्भूत करण्यात आले आहेत.
 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä