आरबीआय/2019-20/243
डीओआर.क्र.बीपी.बीसी.70/21.01.003/2019-20
मे 23, 2020
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता)
महोदय/महोदया,
लार्ज एक्सपोझर्स फ्रेमवर्क - जोडणी असलेल्या प्रतिपक्षाच्या गटाबाबतच्या एक्सपोझरमध्ये वाढ
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र. डीबीआर.क्र.बीपी.बीसी.43/21.01.003/2018-19 दि. जून 3, 2019 चा संदर्भ घ्यावा. ह्या परिपत्रकाच्या परिच्छेद 5.2 अनुसार, जोडणी असलेल्या प्रतिपक्षाच्या गटाबाबत एखाद्या बँकेला असलेल्या सर्व एक्सपोझर मूल्यांची बेरीज, सर्व वेळी, त्या बँकेच्या उपलब्ध व पात्र असलेल्या भांडवली पायाच्या 25% पेक्षा जास्त असू नये.
(2) कोविड-19 च्या देशव्यापी साथीमुळे, कर्ज बाजार व इतर भांडवली बाजार क्षेत्रांमध्ये उपचार अनिश्चितता दिसून येत आहे. परिणामी, अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना भांडवली बाजारातून निधी उभारणे कठीण होत असून, बँकांकडील निधीवरच त्या मुख्यतः अवलंबून आहेत. ह्यासाठी, कॉर्पोरेट कंपन्यांना स्त्रोतांचा अधिकतर लाभ मिळण्यास मदत व्हावी ह्यासाठी, केवळ एकदाच करावयाचा उपाय म्हणून असे ठरविण्यात आले आहे की, जोडणी असलेल्या प्रतिपक्षाच्या गटाबाबत बँकेचे एक्सपोझर, त्या बँकेच्या पात्र असलेल्या भांडवली पायाच्या 25% पासून 30% पर्यंत वाढविण्यात यावे.
(3) ही वाढीव मर्यादा जून 30, 2021 पर्यंत लागु असेल.
आपला विश्वासु,
(सौरव सिन्हा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |