आरबीआय/2019-20/239
ए.पी. (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.32
मे 22, 2020
प्रति
सर्व अधिकृत व्यक्ती
महोदय/महोदया,
विदेशी पोर्टफोलियो निवेशकांच्या (एफपीआय) कर्जामधील गुंतवणुकींसाठी ‘व्हॉलंटरी रिटेंशन रुट’ (व्हीआरआर) – रिलॅक्सेशन्स
प्राधिकृत डीलर वर्ग-1 (एडी वर्ग-1) बँकांचे लक्ष, अधिसूचना फेमा 396/2019-आरबी दि. ऑक्टोबर 17, 2019 अन्वये अधिसूचित केलेल्या, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (कर्ज संलेख) विनियम, 2019 कडे व त्याखाली देण्यात आलेल्या संबंधित निर्देशांकडे वेधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, व्हॉलंटरी रिटेंशन रुट (व्हीआरआर) खालील गुंतवणुकी-मर्यादेचे वाटप पुनः सुरु करणे/उघडणे ह्यावरील, जानेवारी 23, 2020 रोजीचे वृत्तपत्र निवेदन आणि, एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 19 दि. जानेवारी 23, 2020 सह वाचित, एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.34 दि. मे 24, 2019 कडे (ह्यापुढे हे निर्देश असे संबोधित) लक्ष वेधण्यात येत आहे.
(2) ह्या निर्देशांच्या परिच्छेद 6(अ) अन्वये, विदेशी पोर्टफोलियो असलेले निवेशक (एफपीआय), त्यांच्या ‘कमिटेड पोर्टफोलियो साईझ’ च्या किमान 75% एवढी गुंतवणुक, वाटप केल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत करतील. कोविड-19 मुळे झालेला खंड विचारात घेऊन असे ठेरविण्यात आले आहे की, जानेवारी 24, 2020 (गुंतवणुक मर्यांदाचे वाटप पुनः सुरु केल्याची तारीख) ते एप्रिल 30, 2020 दरम्यान गुंतवणुक मर्यादांचे वाटप केले गेलेल्या एफपीआयना, त्यांच्या सीपीआयच्या 75% गुंतवणुक करण्यासाठी तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी दिला जावा. ह्या अतिरिक्त कालावधीचा लाभ घेणा-या एफपीआयसाठी, त्या गुंतवणुकींसाठीचा रिटेंशन कालावधी (गुंतवणुक मर्यादेचे वाटप करतेवेळी त्यांनी वचन दिलेला) हा त्या एफपीआयने त्याच्या सीपीआयच्या 75% गुंतवणुक केल्याच्या तारखेपासून सुरु करण्यास पुनर् निश्चित (रे सेट) केला जाईल.
(3) हे निर्देश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या (1999 चा 42) च्या कलम 10(4) व 11(1) खाली देण्यात आले असून, ते अन्य कोणत्याही कायद्याखाली आवश्यक असलेल्या परवानग्या/मंजुरींच्या विपरीत नाहीत.
आपली विश्वासु,
(डिंपल भांदिया)
प्रभारी महाव्यवस्थापक |