Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (376.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/04/2020
विनियामक अहवाल सादर करणे - कालरेषांचा विस्तार

आरबीआय/2019-20/228
डीओआर.बीपी.बीसी.क्र.68/21.04.018/2019-20

एप्रिल 29, 2020

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(आरआरबी आणि लघु वित्त बँकांसह),
पेमेंट्स बँका आणि स्थानिक एरिया बँका,
अखिल भारतीय वित्तीय संस्था,
सर्व सहकारी बँका,

महोदय/महोदया,

विनियामक अहवाल सादर करणे - कालरेषांचा विस्तार

कोविड-19 च्या देशव्यापी साथीमुळे झालेला खंड विचारात घेऊन, निरनिराळ्या विनियामक अहवालांचे वेळेवारी सादरीकरण करण्यामधील अडचणी कमी करण्यासाठी ते अहवाल सादर करण्यासाठीच्या कालरेषा वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे.

(2) त्यानुसार, वरील संस्थांनी, विनियम विभागाला सादर करावयाचे सर्व विनियामक अहवाल आता, ड्यु डेटपासून 30 दिवसांच्या विलंबाने सादर केले जाऊ शकतील. ही मुदतवाढ, जून 30, 2020 पर्यंत सादर करणे आवश्यक असलेल्या विनियामक अहवालांना लागु असेल. पुढील सविस्तर माहिती जोडपत्रात दिली आहे. ह्या अधीन अहवाल सादर करण्याच्या स्थितीत असलेल्या संस्थांनी तसे करणे सुरुच ठेवावे.

(3) येथे नोंद घेण्यात यावी की, वैधानिक अहवाल, म्हणजे, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949; आरबीआय अधिनियम 1934; किंवा अन्य कोणताही अधिनियम (उदा. सीआर/एसएलआर संबंधित अहवाल) ह्याखाली विहित केलेले अहवाल - सादर करण्यासाठीच्या कालरेषेसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यास परवानगी नाही.

(4) ह्याशिवाय, विनियम विभागाशी केलेला सर्व पत्रव्यवहार/दळणवळण, शक्यतो, कॉर्पोरेट ई-मेलनेच (म्हणजे प्रत्यक्ष कागदपत्रांची हलवाहलवी न करता) केला जावा. ही व्यवस्था पुढील सूचना दिली जाईपर्यंत सुरु राहील.

आपला विश्वासु,

(सौरव सिन्हा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक


जोडपत्र :ड्यु तारखेपासून कमाल 30 दिवसांच्या विलंबाने सादर केल्या जाऊ शकणा-या विनियामक अहवालांची यादी

अनुक्रमांक अहवालाचे नाव अहवाल विहित केला असणा-या अधिनियम किंवा परिपत्रकाचा संदर्भ हा अहवाल लागु असलेल्या विनियमित संस्था. अहवालाची वारंवारता विद्यमान कालरेषा
1 डिव्हिडंडचे प्रदान डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.88/21.02.067/2004-05 मे 4, 2005 एससीबीज (आरआरबी सोडून) आहे तसे व तेव्हा धर्तीवर डिव्हिडंड घोषित केल्यानंतर पंधरवड्याच्या आत.
2 सबॉर्डिनेटेड कर्जे देणे, अपर टायर 2 भांडवल, परपेच्युअल कर्जे व इक्विटी भांडवल (क्वालिफाईड इंस्टिट्युशनल प्लेसमेंट्स क्युआयपी) उभे करणे, परपेच्युअल इश्यु टु प्रमोटर्स (जीडीआर इश्यु) ह्यावरील अहवाल कागदपत्रांच्या प्रतीसह सादर करणे. बेसेल 3 भांडवली विनियमांखाली रिपोर्टिंगच्या आवश्यकता - पुनरावलोकन दि. जून 23, 2016,

महानिर्देश - खाजगी क्षेत्रातील बँकांकडून शेअर्स दिले जाणे व त्यांचे मूल्यांकन दि. एप्रिल 21, 2016,

डीबीआर.क्र.बीपी.बीसी.01/21.06.201/2015-16 दि. जुलै 1, 2015
सर्व वाणिज्य बँका (स्थानिक क्षेत्रीय बँका व आरआरबी सोडून) आहे तसे व तेव्हा धर्तीवर दिले जाण्यापासून एक आठवड्याच्या आत.
3 फॉर्म 1 सर्व बँकांना पाठविण्यात आलेल्या पत्र क्र. 3044/30.01.002/2017-18 दि. सप्टेंबर 27, 2017 अन्वये, डीईए निधी योजना 2014 साठी दिलेली कार्यकारी मार्गदर्शक तत्त्वे. एससीबी (आरआरबींसह), स्थानिक क्षेत्रीय बँका, युसीबी, एसटीसीबी, डीसीसीबी, एसएफबी व पीबी मासिक 30 दिवसात
4 फॉर्म 2 सर्व बँकांना पाठविण्यात आलेल्या पत्र क्र. 3044/30.01.002/2017-18 दि. सप्टेंबर 27, 2017 अन्वये, डीईए निधी योजना 2014 साठी दिलेली कार्यकारी मार्गदर्शक तत्त्वे. एससीबी (आरआरबींसह), स्थानिक क्षेत्रीय बँका, युसीबी, एसटीसीबी, डीसीसीबी, एसएफबी व पीबी मासिक 25 दिवसात
5 गोल्ड मानटोयझेशन स्कीम, 2015 वरील मासिक अहवाल महानिर्देश क्र. डीबीआर.आयबीडी.क्र.45/23.67.003/2015-16 दि. ऑक्टोबर 22, 2015 (ऑगस्ट 16, 2019 रोजी अद्यावत केलेले) एससीबीज (आरआरबी सोडून) मासिक 30 दिवसात
6 त्या महिन्यामध्ये आयात केलेल्या सोने व चांदीचे विवरणपत्र आयबीएस.1758/23.67.001/2002-03 दि. एप्रिल 23, 2003 एससीबीज (आरआरबी सोडून) मासिक 30 दिवसात
7 क्युसीसीपी बाबत एक्सपोझर्स वरील अहवाल डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.82/21.06.217/2013-14 दि. जानेवारी 7, 2014 ‘केंद्रीय प्रतिपक्षांबाबत (सीसीपी) बँकांचे एक्सपोझर - तात्पुरत्या व्यवस्था’ एससीबीज (आरआरबी सोडून) मासिक 30 दिवसात
8 उभ्या केलेल्या एकूण स्त्रोतांवरील मासिक अहवाल वित्तीय संस्थांसाठी स्त्रोत उभे करण्यासाठीचे नॉर्म्स वरील महापरिपत्रक डीबीआर.क्र.एफआयडी.एफआयसी.1/01.02.00/2015-16 दि. जुलै 1, 2015. अखिल भारतीय वित्तीय संस्था मासिक 10 दिवसात
9 मोठ्या एक्सपोझर्सवरील अहवाल डीबीआर. क्र. बीपी.बीसी.43/21.01.003/2018-19 दि. जून 3, 2019 - लार्ज एक्सपोझर फ्रेमवर्क (केंद्रीय समाशोधित (क्लियर्ड) नसलेले डेरिवेटिव् एक्सपोझर्स) एससीबीज (आरआरबी सोडून) त्रैमासिक 30 दिवसात
10 आयएनडी एएस प्रोफॉर्मा (प्रारुप) मूल्ये तिमाहीच्या अखेरीस बँकांना ई-मेलने कळविले जाते. एससीबीज (आरआरबी सोडून) त्रैमासिक 60 दिवसात
11 भारतीय रिझर्व बँकेला तात्पुरता अहवाल पाठविण्यासाठीचा प्रोफॉर्मा - बीसी आऊटलेट्स शाखा प्राधिकृतीकरण धोरणाचे ऍनालायझेशन - मार्गदर्शक तत्त्वांची पुनरावृत्ती वरील डीबीआर.आरआरबी.बीएल.बीसी.क्र .40/31.01.002/2018-19 दि. मे 31, 2019 आरआरबी त्रैमासिक 20 दिवसात
12 पीएसयु गुंतवणुक विवरणपत्र आरपीसीडी.क्र.आरएफ.आरओसी.9/07.02.03/98-99, दि. जून 23, 1999. एसटीसीबी डीसीसीबी त्रैमासिक 30 दिवसात
13 फॉर्म 3 सर्व बँकांना पाठविण्यात आलेल्या पत्र क्र. 3044/30.01.002/2017-18 दि. सप्टेंबर 27, 2017 अन्वये, डीईए निधी योजना 2014 साठी दिलेली कार्यकारी मार्गदर्शक तत्त्वे. एससीबी (आरआरबींसह), स्थानिक क्षेत्रीय बँका, युसीबी, एसटीसीबी, डीसीसीबी, एसएफबी व पीबी सहामाही (31 मार्च आणि 30 सप्टेंबर रोजी समाप्त) 30 दिवसात
14 आरआरबींचा व्यवसाय मिळविणा-या व्यापा-यांचे विवरणपत्र मर्चंट अक्वायरिंग बिझिनेस - प्रादेशिक ग्रामीण बँका ह्यावरील मार्गदर्शक तत्त्वांवरील परिपत्रक डीओआर.आरआरबी.बीएलबीसी.क्र.31/31.01.001/2019-20 दि. फेब्रुवारी 6, 2020. आरआरबी सहामाही (31 मार्च आणि 30 सप्टेंबर रोजी समाप्त) 10 दिवसात
15 प्रारुप - एआयएफआय साठी आयएनडी एएस वित्तीय विवरणपत्र ‘भारतीय लेखा मानके (आयएनडीएएस) ची अंमलबजावणी’ ह्या एआयएफआय ह्यांना पाठविलेले परिपत्रक दि. ऑगस्ट 4, 2016. अखिल भारतीय वित्तीय संस्था सहामाही (31 मार्च आणि 30 सप्टेंबर रोजी समाप्त) 60 दिवसात
16 शेअर होल्डिंगचे विवरणपत्र (शेअर धारण करण्यावरील निर्बंध) एसीडी.बी.आर.388/A.11(19)65-6 दि. मार्च 1, 1966 एसटीसीबी डीसीसीबी वार्षिक 30 दिवसात
17 बिगर बँकिंग अॅसेट्स आरपीसीडी.आरएफ/आरओसी.क्र.15/07.07.11/2000-01, दि डिसेंबर 15, 2000 एसटीसीबी डीसीसीबी वार्षिक 30 दिवसात
18 टेबल 34 (लोकसंख्या/गट निहाय कार्यालयांचे वाटप) आरपीसीडी.सीओ.आरएफ.क्र.बीसी.9/07.06.00/2005-06, दि. जुलै 6, 2005 एसटीसीबी डीसीसीबी वार्षिक 30 दिवसात
 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��