आरबीआय/2019-20/218
डीओआर.बीपी.बीसी.क्र.64/21.02.067/2019-20
एप्रिल 17, 2020
सर्व वाणिज्य बँका आणि सर्व सहकारी बँका,
महोदय / महोदया,
बँकांकडून डिव्हिडंड घोषित केले जाणे (सुधारित)
परिपत्रक डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.88/21.02.067/2004-05 दि. मे 4, 2005 व संबंधित इतर पत्रकांमध्ये दिलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळली जाण्याच्या अटीवर भारतामधील बँकांना लाभांश (डिव्हिडंड) घोषित करण्यासाठी सर्वसाधारण परवानगी देण्यात आली आहे.
(2) कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या उच्चतर अनिश्चिततेच्या परिस्थितीत, बँकांनी, अर्थव्यवस्थेला आधार देण्याची त्यांची क्षमता टिकवून ठेवण्यास व तोटे सोसण्यास त्यांचे भांडवल सांभाळणे/जतन करणे महत्त्वाचे आहे. ह्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, मार्च 31, 2020 रोजी समाप्त झालेल्या वित्तीय वर्षासंबंधीच्या लाभांमधून, बँका, पुढील सूचना दिल्या जाईपर्यंत, आणखी कोणतीही लाभांश प्रदाने करणार नाहीत. सप्टेंबर, 30 2020 रोजी संपणा-या तिमाही साठीच्या बँकांच्या वित्तीय परिणामांवर आधारित, आरबीआय ह्या निर्बंधाचे पुनर् मूल्यांकन करील.
आपला विश्वासु,
(सौरव सिन्हा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |