आरबीआय/2020-21/95
डीओआर.क्र.एलआरजी.बीसी.40/21.04.098/2020-21
फेब्रुवारी 5, 2021
सर्व वाणिज्य बँका
(प्रादेशिक ग्रामीण बँका, स्थानिक क्षेत्र बँका
आणि पेमेंट बँका वगळता)
महोदय/महोदया,
तरलता मानकांवरील बेसेल III साचा - नेट स्टेबल फंडिंग रेशो (एनएसएफआर)
कृपया तरलता मानकांवरील बेसेल III साचा - नेट स्टेबल फंडिंग रेशो (एनएसएफआर) अंतिम मार्गदर्शक तत्त्वे (‘एनएसएफआर मार्गदर्शक तत्त्वे’) वरील परिपत्रक डीबीआर.बीपी.बीसी.क्र.106/21.04.098/2017-18 दि. मे 17, 2018 आणि वरील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी एप्रिल 1, 2021 पर्यंत पुढे ढकलणारे परिपत्रक डीओआर.बीपी.बीसी.क्र.16/21.04.098/2020-21 दि. सप्टेंबर 29, 2020 चा संदर्भ घ्यावा.
(2) कोविड-19 च्या सततच्या ताणतणावाचा विचार करता, पुनरावलोकन केल्यावर, एनएसएफआरच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे आणखी सहा महिने पुढे ढकलण्याचे ठरविण्यात आले आहे. आता ही मार्गदर्शक तत्त्वे, ऑक्टोबर 1, 2021 पासून जारी होतील.
आपली विश्वासु,
(उषा जानकीरामन)
मुख्य महाव्यवस्थापक |