आरबीआय/2020-21/93
डीओआर.सीएपी.बीसी.क्र.34/21.06.201/2020-21
फेब्रुवारी 05, 2021
सर्व वाणिज्य बँका
(लघु वित्त बँका, पेमेंट्स बँका, आरआरबी आणि एलएबी वगळता)
महोदय / महोदया,
बेसेल 3 भांडवली विनियम - संक्रमणात्मक व्यवस्थांचा आढावा
कृपया, ‘बेसेल III भांडवली विनियम - संक्रमणात्मक व्यवस्थांचा आढावा’ वरील परिपत्रक डीओआर.बीपी.बीसी.क्र.15/21.06.201/2020-21 दि. सप्टेंबर 29, 2020 चा संदर्भ घ्यावा.
(2) कोविड-19 चा सततचा ताणतणाव विचारात घेऊन व परिस्थिती पूर्ववत होण्यास मदत म्हणून, कॅपिटल कंर्झव्हेशन्स बफर (सीसीबी) च्या 0.625% च्या शेवटच्या हप्त्याची अंमलबजावणी, एप्रिल 1, 2021 पासून ऑक्टोबर 1, 2021 पर्यंत पुढे ढकलण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, ‘बेसेल III भांडवली विनियम’ वरील महापरिपत्रक, डीबीआर.क्र.बीपी.बीसी.1/21.06.201/2015-16 दि. जुलै 1, 2015 च्या विभाग ड ‘कॅपिटल कंर्झव्हेशन बफर फ्रेमवर्क’ च्या परिच्छेद 15.2.2 मधील किमान कॅपिटल कंर्झव्हेशन रेशोज्, ऑक्टोबर 1, 2021 रोजी सीसीबीचा स्तर 2.5% पर्यंत होईपर्यंत लागु असणे सुरुच राहील.
(3) अतिरिक्त टायर 1 च्या संलेखांच्या (परपेच्युअल अपरिवर्तनीय प्रिफरन्स शेअर्स व परपेच्युअल कर्ज संलेख) रुपांतरण/राईट डाऊन द्वारा नोटा समावून घेण्यासाठीचे पूर्व-विहित ट्रिगर हे, जोखीम भारित अॅसेट्सच्या (आर डब्ल्यु ए) 5.5% राहतील व एप्रिल 1, 2021 पासून आरडब्ल्युए च्या 6.125% पर्यंत वाढतील.
आपली विश्वासु,
(उषा जानकीरामन)
मुख्य महाव्यवस्थापक |