आरबीआय/2020-21/61
डिओआर.क्र.बीपी.बीसी.26/21.04.048/2020-21
ऑक्टोबर 26, 2020
सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसह)
सर्व प्राथमिक (शहरी) सहकारी बँका / राज्य सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
अखिल भारतीय वित्तीय संस्था
सर्व नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह)
महोदय/महोदया,
विहित/विशिष्ट कर्ज खात्यांमध्ये कर्जदारांना चक्रवाढ व्याज व सरळ व्याज ह्यामधील फरकाचे सानुग्रह प्रदान करण्याची योजना (1-3-2020 ते 31-8-2020)
भारत सरकारने, ऑक्टोबर 23, 2020 रोजी, विहित/विशिष्ट कर्ज खात्यांमध्ये, कर्जदारांना, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज ह्यामधील फरकांचे सानुग्रह प्रदान करण्याची योजना (1-3-2020 ते 31-8-2020) (ही योजना) घोषित केली आहे. त्यानुसार, संबंधित कर्जदायी संस्थांकडून कर्जदारांच्या काही विशिष्ट वर्गांना, मार्च 1, 2020 ते ऑगस्ट 31, 2020 च्या दरम्यान चक्रवाढ व्याज व सरळ व्याज ह्यामधील फरकाचे सानुग्रह प्रदान त्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. ह्या योजनेचा तपशील येथे उपलब्ध आहे :
https://financialservices.gov.in/sites/default/files/Scheme%20Letter.pdf.
(2) सर्व कर्जदायी संस्थांना सांगण्यात येते की त्यांनी ह्या योजनेच्या तरतुदींचे मार्गदर्शन घेऊन विहित केलेल्या कालावधीत आवश्यक ती कारवाई करावी.
आपला विश्वासु,
(प्रकाश बलियारसिंग)
मुख्य महाव्यवस्थापक |