आरबीआय/2020-21/75
डीओआर.बीपी.बीसी.क्र.29/21.02.067/2020-21
डिसेंबर 04, 2020
सर्व वाणिज्य बँका आणि सर्व सहकारी बँका,
महोदय/महोदया,
बँकांकडून लाभांशाची घोषणा
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीओआर.बीपी.बीसी.क्र.64/21.02.067/2019-20 दि.एप्रिल 17, 2020 चा संदर्भ घ्यावा.
(2) कोविड-19 मुळे निर्माण होत असलेला सततचा ताणतणाव व वाढती अनिश्चितता ह्याचा विचार करता, अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी व नोटा समावून घेण्यासाठी बँकांनी भांडवल नीट सांभाळून/राखून ठेवणे अत्यावश्यकच आहे. बँकांचे ताळेबंद अधिक बळकट करण्यासाठी व त्याच वेळी ख-या अर्थव्यवस्थेला कर्ज देण्यास आधार देण्यासाठी ठरविण्यात आले आहे की, मार्च 31, 2020 रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठीच्या लाभामधून, बँका, इक्विटी शेअर्सवर कोणताही लाभांश देणार नाहीत.
आपली विश्वासु,
(उषा जानकीरामन)
मुख्य महाव्यवस्थापक |