नोव्हेंबर 01, 2016
2011 च्या जनगणनेनुसार आरबीआयकडून ब्रँच लोकेटरचे अद्यावतीकरण
भारतीय रिझर्व बँकेने तिचे ब्रँच लोकेटर (म्हणजे, वाणिज्य बँकांच्या शाखा/कार्यालये ह्यांची यादी असलेली, तिच्या वेबसाईट वरील लिंक) अद्यावत केले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सुधारित पायाभूत लोकसंख्येनुसार, निरनिराळ्या लोकसंख्या गटांमध्ये, ह्या लिंकने, शाखा/कार्यालयांचे वर्गीकरण केले आहे. आरबीआयचे परिपत्रक (आरबीआय/2016-17/60/डीबीआर.क्र..बीएपीडी.बीसी.12/22.01.001/2016-17 दिनांक, सप्टेंबर 1, 2016) मध्ये निर्देशित केल्यानुसार, 2011 च्या जनगणनेनुसार, केंद्रासाठीच्या लोकसंख्या गट वर्गीकरणाची परिणामकारक तारीख सप्टेंबर 1, 2016 आहे.
शाखा/कार्यालये असलेल्या ठिकाणी असलेल्या केंद्रांचे अलिकडील (2011 सालच्या) जनगणना माहितीवर आधारित लोकसंख्येनुसार चार गटात (ग्रामीण, अर्ध नागरी, नागरी, महानगरी) वर्गीकरण केले जाईल. ब्रँच लोकेटच्या कोष्टकांवरील संबंधित टीपा तसेच ह्या लिंकवरील
(https://rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=2035) केंद्रांची ओळख पटविण्याबाबत वापरण्याची मार्गदर्शक तत्वेही अद्यावत करण्यात आली आहेत.
रिझर्व बँकेने शाखा प्राधिकृतीकरणावर दिलेल्या तिच्या महापरिपत्रकानुसार बँकांनी दिलेल्या माहितीच्या आधाराने, रिझर्व बँकेने ही माहिती एकत्रित केली आहे.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1081
|